पृथ्वी सोशल फाउंडेशनतर्फे पर्यावरण संरक्षण व सामाजिक जनजागृती उपक्रम


पिंपरी, पुणे (प्रतिनिधी) – Pruthvi Social Foundation यांच्या वतीने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थेचे उद्दिष्ट समाजातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे हे आहे.

संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, माहिती अधिकार जनजागृती, महिला व बालकल्याण तसेच असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य केले जात आहे.

संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक विकासासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

अधिक माहितीसाठी:
पृथ्वी सोशल फाउंडेशन
नोंदणी क्रमांक: महा/815/2026/पुणे
पत्ता: लाल टोपी नगर, मोरवाडी, पिंपरी, पुणे 411018
Instagram / Facebook / X: @psfmaha