PC वार्ता न्यूज: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा प्रचाराचा धडाका; प्रभाग २० मध्ये भगवे वादळ, उमेदवारांचा उत्स्फूर्त शुभारंभ!

PC वार्ता न्यूज: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा प्रचाराचा धडाका; प्रभाग २० मध्ये भगवे वादळ, उमेदवारांचा उत्स्फूर्त शुभारंभ!
पिंपरी-चिंचवड: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक २० (संत तुकाराम नगर- वल्लभनगर) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा अत्यंत दिमाखात शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि संपूर्ण परिसरात निर्माण झालेले 'भगवामय' वातावरण भाजपच्या विजयाचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे.
'विकासाभिमुख हिंदुत्व' हाच विजयाचा मंत्र
प्रचाराच्या शुभारंभावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी "विकासाभिमुख हिंदुत्व" या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात असल्याचे सांगितले. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विकासकामांच्या जोरावर प्रभाग २० मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभाग २० मधील भाजपचे अधिकृत उमेदवार:
या प्रभागातून भारतीय जनता पार्टीने खालील चार खमक्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे:
१. श्री. संदीप बागडे
२. सौ. रश्मी लांडे
३. सौ. सुजाता पालांडे
४. श्री. सतिश नागरगोजे
नागरिकांना मतदानाचे आवाहन
" उमेदवार कमळ" हा नारा देत, मतदारांनी 'कमळ' चिन्हासमोरील बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी भोसरी विधानसभाचे आमदार महेश लांडगे व भाजपचे  स्थानिक पदाधिकारी, मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.