पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची 'महा-भरती'! 'भक्ती-शक्ती' स्थळावरून विजयाचा संकल्प; शिवसेना-राष्ट्रवादीला मोठे खिंडार
पिंपरी-चिंचवड: आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजले असून, भारतीय जनता पार्टीने शहरात आपला वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. भोसरीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधील विविध पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत 'भक्ती-शक्ती' शिल्प येथे अभिवादन करून विजयाचा संकल्प सोडण्यात आला.
शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादीची पडझड
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, भोसरी विधानसभेतील शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी 'कमळ' हाती घेतले आहे. यामुळे विरोधकांना मोठे खिंडार पडल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
भाजपा परिवारामध्ये सामील झालेले प्रमुख चेहरे:
भोसरी विधानसभा व शिवसेना (UBT) पदाधिकारी:
श्री. भरत लांडगे, श्री. संतोष वाळके (शहर संघटक), श्री. अविनाश लोणारे (उपविभाग प्रमुख), श्री. भाऊसाहेब काटे, श्री. साईनाथ ढाकणे (समन्वयक), श्री. मनोज परांडे, श्री. राजकुमार बांगर.
शाखाप्रमुख व कार्यकर्ते: श्री. प्रिमशिल पोटभरे, श्री. सचिन नायकुडे, श्री. सुभाष खेडकर, श्री. नवनाथ परांडे, श्री. पंडित वाळके, श्री. बापुशेठ परांडे, श्री. नितीन परांडे, श्री. पप्पु तुपे, श्री. चेतन कदम, श्री. संकेत परांडे, श्री. शुभम वाळके, श्री. ऋत्विक कदम, श्री. अमित सोरटे, श्री. सुदर्शन कदम, श्री. अजय काळे, श्री. प्रदीप परांडे, श्री. किरणशेठ वाळके, श्री. अजय परांडे, श्री. निलेश वाळके.
राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सेलचे पदाधिकारी:
श्री. अनवर शेख, श्री. गणेश सानप, श्री. संतोष फुंदे, श्री. रविंद्र राख, श्री. अजहर खान (सरचिटणीस).
सौ. गंगाताई धेंडे (अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), ॲड. विशाल जाधव (कायदा सेल), श्री. गणेश सस्ते (अध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती), श्री. गणेश यादव, सौ. शुभांगी जाधव (महिला आघाडी).
विजयाचा 'शुभारंभ' आणि संकल्प
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते २०२६ च्या निवडणुकीचा अधिकृत प्रचार शुभारंभ करण्यात आला. "विकासाभिमूख हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुन्हा एकदा शहराच्या सेवेसाठी सज्ज आहोत," असा विश्वास यावेळी पक्षाकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी 'पुन्हा भाजपा'चा नारा दिला.