"जोमाने कामाला लागा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवा!" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पिंपरी-चिंचवडच्या चारही आमदारांचे अभिनंदन.
पुणे: पुणे येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी शहरातील चारही आमदार — आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे व आमदार उमाताई खापरे — यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
"तुमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले आहे. आता मतदारांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विकासकामांतून सार्थ ठरवून दाखवा," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच, पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन पूर्णपणे खंबीर असून महानगरपालिकेला सर्व आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. "जनतेची कामे प्राधान्याने पूर्ण करा," असा स्पष्ट संदेश देत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
