महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागांत जोरदार प्रचार सभा
📍 पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागांमध्ये जोरदार सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सभांमधून नागरिकांना संबोधित करताना, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
प्रभाग क्रमांक २१ मधील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीम. निकिताताई कदम, श्री. संदीप वाघेरे, श्रीम. प्रियंकाताई कुदळे आणि श्री. डब्बू आसवानी यांच्या समर्थनार्थ नागरिकांना आवाहन करण्यात आलं.
यावेळी बोलताना सांगण्यात आलं की, शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारधारेतूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण सुरू आहे. १९९२ ते २०१७ या कालावधीत शहराचा विकास करताना कधीही महापालिकेला कर्जबाजारी केलं नाही, उलट ठेवी वाढवत पारदर्शक कारभार करण्यात आला, असा दावा करण्यात आला.
सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना, आशिया खंडातील श्रीमंत मानली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आज कर्जाच्या खाईत ढकलली गेल्याचं सांगण्यात आलं. हजारो कोटींचं बजेट असूनही प्रत्यक्ष कामं दिसत नाहीत, ठेवी कमी झाल्या असून भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि खोदाई माफियांचा त्रास वाढला आहे, असा आरोप करण्यात आला. जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेलाच मिळायला हवा, असं ठामपणे नमूद करण्यात आलं.
त्यानंतर प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतही नागरिकांना संबोधित करण्यात आलं.
प्रभाग १६ मधून श्रीम. श्रेयाताई अक्षय गायकवाड, श्रीम. जयश्रीताई मोरेश्वर भोंडवे, श्रीम. आशाताई तानाजी भोंडवे, श्री. मोरेश्वर महादू भोंडवे,
प्रभाग १७ मधून श्रीम. मनिषाताई राजेश आरसुळ, श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर, श्रीम. शोभाताई तानाजी वाल्हेकर, श्री. शेखर बबन चिंचवडे,
तर प्रभाग १८ मधून श्रीम. पूजाताई प्रशांत आगज्ञान, श्रीम. ज्योतीताई सचिन निंबाळकर, श्री. अनंत सुभाष कोऱ्हाळे, श्रीम. अश्विनीताई गजानन चिंचवडे यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं.
या सभेदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही उपस्थिती लावण्यात आली. यावेळी अधिकृत उमेदवार श्री. धनंजय विठ्ठल काळभोर, सौ. प्रितमराणी प्रकाश शिंदे, सौ. सरिताताई अरुण साने, श्री. नीलेश ज्ञानदेव शिंदे तसेच मतदारांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
तसेच तापकीर नगर, काळेवाडी येथे प्रभाग क्रमांक २२ आणि २७ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजय निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या भूमिकेवर भर देण्यात आला.
प्रभाग २२ मधून श्रीम. मोनिकाताई नवनाथ नढे, श्रीम. उषाताई दिलीप काळे, श्री. मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर, श्री. संतोष अंकुश कोकणे,
तर प्रभाग २७ मधून श्री. सुमित डोळस, सौ. अश्विनीताई तापकीर, सौ. अनिताताई थोपटे, श्री. सागर कोकणे यांना बहुमतांनी निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं.
AI, तंत्रज्ञान, उद्योग आणि स्टार्टअप्सच्या युगात पिंपरी-चिंचवडमधील तरुणांना नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे बनवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, महिला सुरक्षितता, पर्यावरण, पाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.
ही निवडणूक केवळ आजची नसून पुढील पिढीच्या भवितव्याची आहे, असे सांगत पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं.


