पिंपरी (PC Varta):
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक २८ मधील संपूर्ण पॅनेलच्या अधिकृत कॅलेंडरचे दिमाखदार प्रकाशन आज संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले.
आगामी काळातील जनसंपर्क आणि प्रभागातील विकासकामांच्या नियोजनाच्या दृष्टीने हे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पॅनेलच्या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे तसेच प्रकाश सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

