पुणे दि.२० - विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ९०/२०२५. भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४ (२) या गुन्हयातील आरोपीचा शोध विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोडव तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पोलीस अंमलदार अमजद शेख व संजय बादरे, यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा आदित्य उकीरडे याने केला आहे त्यावरुन तपास पथक अधिकारी पोउनि राठोड यांनी तपास पथकातील अंमलदार यांची टिम तयार करून आरोपी आदित्य भैरवनाथ उकीरडे वय २४ व्षे, रा. प्रेमळ दत्त मंदिराजवळ, लेन नं १२. भैरवनगर, धानोरी पुणे यास गुन्हयात अटक करुन त्याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेले ८०,०००/- रुपये किंमतीचे २० ग्रेम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हा करुन पळून जाण्यासाठी वापरलेली ५० हजार - रु कि.ची मोटार सायकल असा एकुण १,३०,०००/- रु. किं.चा मुददेमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुत्त परिमंडळ ड, पुणे श्री. हिंमत जाधव,मा.सहा.पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे श्री. विठ्ठल दबडे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक
( गुन्हे ), श्री मंगेश हांडे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे,यशवंत किर्व.,कृष्णा माचरे अमजद शेख,वामन सावंत,संजय बादरे, संपत भोसले,संदीप देवकाते,अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली.
