उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या हस्ते जालन्यात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

जालना दि. 20 : आज जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.जालन्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त करत, मराठवाड्यातील कृषी, औद्योगिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दादांनी उपस्थितांना दिले. 



यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या माजी आयुक्त  आर्दड यांसह जिल्हा परिषद सदस्य, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य मान्यवरांचे पक्षात स्वागत करत, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.  


या उद्घाटन सोहळ्यास जालना जिल्हाध्यक्ष  अरविंदजी चव्हाण, आमदार मनोज कायंदे, आमदार . विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.